आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरातील चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चेंगराचेंगत चार भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर इतर सहा जण गंभीर जखमी झाले. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तिरुपती मंदिरातील वैकुंठ द्वार दर्शन दहा दिवसांसाठी खुले करण्यात आले आहे. या दर्शनाचे तिकीट मिळवण्यासाठी हजारो भाविक विविध तिकीट केंद्रांवर सकाळपासून रांगा लावून उभे होते. यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली, ज्यात तीन-चार भाविकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर तात्काळ तिरुपती पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. अजूनही हजारो भाविक दर्शनासाठी रांगा लावून आहेत.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी चेंगराचेंगरीत भाविकांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री नायडू यांनी या घटनेतील जखमींवर करण्यात येत असलेल्या उपचारांबाबत अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदतकार्य करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून जखमींना चांगले उपचार मिळू शकतील.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here