मुंबईसह उपनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील हवेची गुणवत्ता खालवल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा खालवला आहे. मुंबईची हवा अत्यंत चिंताजनक स्थितीत पोहोचली आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईत ठिकठिकाणी अंशत: ढगाळ वातावरण दिसत आहे. यामुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या मुंबईचा हवा निर्देशांक १०४ इतका नोंदवण्यात आला आहे. यामुळे आता मुंबई महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळाने कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईचा हवा निर्देशांक १०४ इतका असल्याची नोंद करण्यात आली आहे. काही भागात हवेचा निर्देशांक अतिवाईट स्थितीत नोंदवण्यात आला आहे. तर काही भागात वाईट हवेची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतील विलेपार्ले, कुलाबा, मालाड, कुर्ला, भांडुप, देवनार, बोरिवली, वांद्रे पूर्व या ठिकाणच्या हवेची गुणवत्ता अतिवाईट स्थितीत असल्याचे बोललं जात आहे.

तर छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, जुहू, महापे, नेरुळ या ठिकाणी हवेची गुणवत्ताही वाईट असल्याचे नोंद करण्यात आले आहे. मुंबईत सातत्याने होणारे वातावरणातील बदल आणि बांधकामे यामुळे मुंबईतील हवेवर सातत्याने परिणाम होत आहे. यामुळे असंख्य मुंबईकरांना सध्या प्रदूषणाचा त्रास होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here