
प्रसिद्ध मल्याळम अभिनेता दिलीप शंकर आज २९ डिसेंबर रोजी तिरुअनंतपुरममधील एका हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांनी घटनेबाबत गुन्हा दाखल केला असून चार दिवसांपूर्वी त्याने हॉटेलमध्ये चेक इन केले होते, असं अहवालात म्हटलं आहे.
हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की गेल्या दोन दिवसांपासून तो त्याच्या खोलीतून बाहेर आला नव्हता. त्याच्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने आम्ही त्याची खोली उघडली. त्याची खोली उघडताच आम्हाला त्याचा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांना तत्काळ कळवण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की, खोलीची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम पाठवण्यात आली आहे. दिलीप शंकर यांनी आत्महत्या केली की नैसर्गिक मृत्यू हे अद्याप समजलेलं नाही.
रिपोर्टनुसार, दिलीप शंकर यांचा मृतदेह तिरुअनंतपुरममधील हॉटेलच्या खोलीमध्ये सापडला आहे. ते ‘पाचगणी’ या टीव्ही शोचं शूटिंग करत होते आणि त्यासाठी ते गेल्या काही दिवसांपासून त्याच हॉटेलमध्ये राहत होते. खोलीतून दुर्गंधी येत असल्याचं हॉटेल कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर दिलीप यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.



