वैजापूर । दिपक बरकसे

वैजापूर शहरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. रस्त्यावरच कचऱ्याचे ढिगारे दिसतात. यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, त्यांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे.

साचलेल्या या कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. तक्रारी करूनही नगर परिषद लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. विशेष म्हणजे धनदांडग्या व उच्चभ्रू वस्तीतच साफ सफाई सध्यातरी होताना दिसत आहे., अशी नागरिकांची तक्रार आहेत. प्रशासकिय अधिकारी प्रत्यक्ष स्वतः लक्ष देत नसतील तर आम्ही साफ सफाई करु का? असा उद्दिग्न सवाल नागरिक करत आहे.

हे वाचलं का? – धक्कादायक! पुण्यात डंपरने फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडलं

स्वच्छ शहर अभियानाला स्वतः पालिकेनेच हरताळ फासण्याचे काम चालवले आहे,असे नागरिकांचे म्हणणे आहे. वैजापूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या उदासीनतेमुळे शहरवासीयांना याचा फटका सहन करावा लागत आहे. कचर्‍याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच भटके जनावर, कुत्रे यांचा वावर वाढला आहे. या जनावरांमुळे कचरा इतरेतर पसरला जातो आणि सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरत आहे. यामुळे आसपासच्या परिसरात दुर्गंधी आणि रोगराईचे सावट घोंगावत आहे.

घरातच कचरा बाहेरचा विसरा

स्वच्छ आणि सुंदर वैजापूर शहराची प्रतिमा ही गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अस्वच्छतेमुळे बदललीच आहे. अशातच वैजापूर नगरपालिकेच्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला दिसून येत आहे. नगरपालिकेच्या पाठीमागील बाजूला अस्वच्छतेचे व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून एकेकाळी राज्यात स्वच्छतेसाठी गाजलेल्या वैजापूर नगरपालिकेच्या कार्यालयाच्या प्रांगणातच आता कचरा पडलेला दिसून येतोय. “घरातच कचरा बाहेरचा विसरा” या वाक्याप्रमाणे जर नगरपालिकेला आपले कार्यालयात स्वच्छ ठेवता येत नसेल तर शहराच्या स्वच्छते बाबत विचारत सोडा अशी चर्चा सध्या सुरू आहे.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीचे ताजे अपडेट मिळवण्यासाठी क्लीक करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here