काही दिवसांपूर्वी बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्रकरण ताजं असताना आता धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर देखील जीवघेणा हल्ला झाला आहे.

मेसाई जवळगा गावाचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय. परंतु या हल्ल्यात सरपंच नामदेव निकम (Sarpanch Namdev Nikam) बचावले आहेत. बारूळ गावाजवळ मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. मध्यरात्री नामदेव निकम हे गाडीने प्रवास करत होते. त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ देखील होता. यावेळी अचानक काही गुंडांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. गाडीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा देखील प्रयत्न केलाय. हा हल्ला पवनचक्कीच्या वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here