
महाराष्ट्रात पुन्हा गुलाबी थंडी गेल्या दोन आठवड्यांपासून गायब झालेली थंडी पुन्हा जाणवू लागली आहे. अनेक भागांमध्ये तापमान १० अंशांच्या खाली गेले आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी तापमानाचा पारा कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यातील कमाल तापमान २ ते ३ अंशांनी कमी होईल, आणि कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या ४ ते ५ दिवसांमध्ये हळूहळू कमाल तापमान दोन ते तीन अंशांनी घसरणार आहे. किमान तापमान देखील पुढील ३ दिवसात दोन ते तीन अंशांनी घसरेल, असे हवामान विभागाने अंदाज वर्तवले आहेत. तसेच, हवामान विभागाने पुढील ४८ तासांत किमान तापमानात फारसा बदल होणार नसल्याचे म्हटले आहे.
हे वाचलं का? – भ्रष्टाचार उघड करणं तरूण पत्रकाराच्या जीवावर बेतलं, सेप्टिक टँकमध्ये सापडला मृतदेह
राज्यातील काही भागांमध्ये सकाळच्या सुमारास थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. गेल्या आठवड्यात किमान तापमान १५ ते २० अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिक उकाड्याने आणि घामाच्या धारांनी त्रस्त झाले होते. आता एकदा पुन्हा थंडीला पोषक वातावरण तयार झाले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तापमान हळूहळू कमी होईल, आणि गारठा वाढण्याची शक्यता आहे.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



