All The Best! राज्यात आजपासून बारावीची परीक्षा, राज्यातील १५ लाख विद्यार्थी देणार परीक्षा

गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षा लागलेल्या बारावी बोर्ड परीक्षा आजपासून (Class 12 Board Exams 2025) सुरु होत आहेत. यामध्ये राज्यातील 3 हजार 373 परीक्षा केंद्रावर मंगळवारपासून बारावीच्या परीक्षा सुरु होणार आहे. ही परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे. (12th Board Exam Date)

यंदा परीक्षेसाठी (HSC Exam 2025) एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये ८ लाख १० हजार ३४८ मुले, तर ६ लाख ९४ हजार ६५२ मुली आहेत. परीक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे. परीक्षेचा निकाल १५ मे पर्यंत लावण्याचे उद्दिष्ट मंडळाने ठेवले आहे. (Maharashtra Board Exams)

परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून जीपीएसचा लाइव्ह ट्रॅकिंग होणार आहे. परीक्षा केंद्रावर व्हिडीओ चित्रीकरणही होणार आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीचा वॅाच असणार आहे. (HSC Board Exam Result Date)

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

याशिवाय दक्षता समिती कार्यरत असून विभागीय मंडळात विशेष भरारी पदके स्थापन करण्यात आली आहेत. मंडळाने निर्धारित केलेल्या कालावधीत विद्यार्थी, वैद्यकीय कारणास्तव प्रत्यक्ष तोंडी परीक्षा प्रकल्प व इतर परीक्षा देऊ न शकल्यास अशा विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेनंतर १२,१५,१७ मार्च रोजी आऊट ऑफ टर्न आयोजित करण्यात आलेले आहे. (Exam Guidelines)

विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी? (Student Exam Tips)

  • विद्यार्थ्यांना आता हॉल तिकिटासोबतच महाविद्यालयाचे ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे.
  • वाहतूक कोंडीचा विचार करता पालक आणि विद्यार्थ्यांनी थोडं आधीच घरातून निघावं.
  • आपल्याला ज्या कपड्यांमध्ये मोकळं ढाकळं वाटेल असेच कपडे परिधान करा.
  • पुरेसा नाश्ता करुन जाणे आवश्यक आहे पण जास्त जड पदार्थ खावू नका.
  • ११ ही वेळ पेपरची योग्य आहे अशा वेळी विद्यार्थ्यांनी आपलं लक्ष केंद्रीत कसे राहिल याची काळजी घ्या.
  • मानसिक आणि शारीरिक ताण येईल अशा कोणत्याच गोष्टी करु नका.
  • परीक्षेला जाताना पाण्याची बाटली आणि पेन महत्त्वाचे इतर साहित्य आवर्जून घ्यावे.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

पालकांनी काय करावं?

  • पालकांनी विद्यार्थ्यांवर पेपरला जाण्यापूर्वी कोणत्याच प्रकारची चिडचिड किंवा घाई करु नये.
  • मुलांना त्यांचा असा थोडा वेळ द्यावा.
  • तसेच या परीक्षेच्या काळात पालकांनी विशेष काळजी घ्यावी. हलका आहार द्यावा.
  • फार ताण होणार नाही असं वातावरण घरी नसावं. हलकं आणि अतिशय आनंदी वातावरण ठेवावे.
  • विद्यार्थी पेपर देऊ आल्यावर पेपर कसा गेला? कोणत्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहिलं असं विचारु नये? त्यांना त्यांचा असा वेळ द्यावा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाद्वारे देशभरातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हा कार्यक्रम दिल्लीतील प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान बोर्डाच्या परीक्षेपूर्वीचा ताण आणि भीती कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदी आठव्यांदा विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी परीक्षांबद्दल संवाद साधला. यावेळी मोदींनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याशिवाय मोदींनी मुलांना गणित कसे हाताळायचे याचे तंत्र देखील शिकवले.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here