ऑपरेटर फसवणूकप्रकरणी भग्गाव ग्रामपंचायतची तक्रार

वैजापूर । दिपक बरकसे

ग्रामपंचायत ऑपरेटर फसवणूकप्रकरणी पहिली तक्रार भग्गाव ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली आहे. ऑपरेटर अविनाश दादासाहेब पवार याने ग्रामपंचायतीचा निधी स्वतःच्या खात्यात वळवून घेतल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता.

या प्रकारामुळे पंचायत समिती कार्यालयात एकच खळबळ उडाली होती. १३ ग्रामपंचायतींचा लाखो रुपयांचा निधी पवार याने स्वतःच्या खात्यात वळवून घेतला होता. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर भग्गाव ग्रामपंचायतीने पहिली तक्रार वैजापूर पोलीस ठाण्यात दाखल केली.

भग्गाव ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगाच्या खात्यातील रक्कम आपले सरकार सेवा केंद्राच्या खात्यात भरण्यासाठी ऑ परेटर अविनाश पवार याच्याकडे दिली होती. २८ ऑगस्ट २०२४ रोजी १ लाख ६ हजार ५८० रुपये व १९ मार्च २०२५ रोजी ५० हजार रुपये रक्कम वर्ग करण्यासाठी देण्यात आली. परंतु, ऑपरेटर अविनाश पवार याने ही रक्कम स्वतःच्या खात्यात वळवून घेतली. १६ जुलै रोजी हा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी सरपंच अशोक जगताप व ग्रामपंचायत अधिकारी एस.बी. कोळे यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी दिली.

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here