
वैजापूर । दिपक बरकसे
वैजापूर येथील वखार महामंडळाच्या गोदामातून सुमारे सात लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा विद्युत आणि धातूजन्य साहित्याचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. (Vaijapur warehouse theft)
या प्रकरणी शैलेश रावसाहेब गाडे यांच्या तक्रारीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, ८ जुलै ते १५ जुलै या कालावधीत ही चोरी झाली आहे. गोदामातून ६०० किलो तांबे, ज्याची अंदाजे किंमत ३.९० लाख रुपये, तसेच ७०० लिटर डीपी ऑइल (किंमत ८४,०००), १,०२० किलो सिलीकोन स्टील (किंमत ५१,०००) आणि दोन लाख रुपये किमतीचे विविध विद्युत साहित्य असा एकूण मिळून ७,२५,००० चा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला (warehouse robbery)
हे वाचलं का? – मोठी बातमी! महिला कीर्तनकाराच्या हत्येचे गूढ उकलले; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून, पोलीस उपनिरीक्षक पाडळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. गोदाम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, चोरट्यांनी आत प्रवेश करण्यासाठी कोणता मार्ग वापरला याचा शोध घेण्यात येत आहे. (Copper theft in Maharashtra) या चोरीमुळे वखार महामंडळ व परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. (Headlines Marathi)
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.


