शहीद किरण शेखावत यांच्याबाबतची पोस्ट पुन्हा व्हायरल, पण सत्य वेगळंच आहे!

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर भारतीय नौसेनेतील शूर महिला अधिकारी किरण शेखावत यांच्याबाबत एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये असा दावा करण्यात येत आहे की, त्या अलीकडेच ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान शहीद झाल्या. मात्र, ही माहिती पूर्णतः चुकीची असून, लेफ्टनंट किरण शेखावत या दहा वर्षांपूर्वी २०१५ मध्येच गोव्यात झालेल्या विमान दुर्घटनेत शहीद झाल्या होत्या. (Kiran Shekhawat viral post)

२४ मार्च २०१५ रोजी रात्रीच्या प्रशिक्षण उड्डाणादरम्यान गोवा किनाऱ्यालगत भारतीय नौदलाचे डॉर्नियर विमान कोसळले. या भीषण अपघातात लेफ्टनंट किरण शेखावत आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. त्या कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या भारतीय नौसेनेतील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या. त्यांच्या बलिदानाची नोंद भारतीय संरक्षण इतिहासात मोठ्या आदराने झाली आहे. (Lt. Kiran Shekhawat real story)

हे वाचलं का? – अवघ्या काही तासांत ‘पाक’कडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूत गोळीबार, श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज… Video समोर

लेफ्टनंट किरण शेखावत यांचा जन्म १ मे १९८८ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचा सैनिकी पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांच्यात देशसेवेचा वारसा लहानपणापासूनच रुजला होता. शिक्षणासाठी त्यांनी टोकियोतील जपान इंटरनॅशनल स्कूल, तसेच भारतातील विविध केंद्रीय विद्यालयांमध्ये शिक्षण घेतले. पुढे त्यांनी आंध्र विश्वविद्यालयातून भौतिकशास्त्रात पदवी मिळवली. २००९ मध्ये त्यांनी सेवा निवड मंडळाची (SSB) परीक्षा उत्तीर्ण करून भारतीय नौदलात प्रवेश मिळवला आणि २०१० मध्ये भारतीय नौदल अकादमी, एझीमाला, केरळ येथे प्रशिक्षण पूर्ण केले.

नौदलात त्यांच्या सेवेला सुरुवात ५ जुलै २०१० रोजी झाली. त्या INAS ३१० स्क्वाड्रनमध्ये निरीक्षक (Observer) म्हणून कार्यरत होत्या. या पदावर त्यांनी डॉर्नियर विमानामधून समुद्रसुरक्षा, गस्ती व गुप्तचर मोहिमांमध्ये सहभाग घेतला. विशेष म्हणजे, त्यांनी २०१३ मध्ये सिंगापूरमध्ये पार पडलेल्या SIMBEX (सिंगापूर-भारतीय सागरी द्विपक्षीय सराव) मोहिमेतही भाग घेतला होता. (Indian Navy female officer martyr)

हे वाचलं का? – कसं फत्ते झालं ‘ऑपरेशन सिंदूर’? २३ मिनिटांत पाकिस्तानच्या चिंधड्या उडवणारे ‘ते’ ९ व्हिडिओ समोर

त्यांच्या शौर्याच्या स्मरणार्थ हरियाणातील कुथरला येथे ‘शहीद पार्क’ उभारण्यात आले आहे. तसेच त्यांच्या नावाने मुलींसाठी खास महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबाने स्थापन केलेल्या ‘लेफ्टनंट किरण शेखावत फाउंडेशन’ द्वारे समाजातील वंचित घटकांसाठी काम सुरू आहे. या संस्थेमार्फत युवकांमध्ये देशभक्ती, शिक्षण आणि सेवाभाव निर्माण करणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. (Operation Sindoor fake news)

सध्या व्हायरल होत असलेली किरण शेखावत यांच्याबाबतची पोस्ट ही भावनिक असली तरी पूर्णपणे दिशाभूल करणारी आहे. त्यांनी २०१५ मध्येच शहीद होऊन भारतमातेच्या सेवेत आपले प्राण अर्पण केले होते. त्यामुळे जनतेने सोशल मीडियावरील कोणतीही माहिती तपासल्याशिवाय शेअर करू नये, असे आवाहन संरक्षण खात्याच्या सूत्रांकडून करण्यात आले आहे. (Kiran Shekhawat 2015 plane crash)

हे वाचलं का? – भारताचा BSF जवान पाकिस्तानच्या ताब्यात, नेमकं काय घडलं?

लेफ्टनंट किरण शेखावत यांचे बलिदान हे भारतीय सैन्याच्या शौर्याची गौरवशाली गाथा आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक युवकांना सैन्यात सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळते आहे. मात्र त्यांच्या नावाचा वापर चुकीच्या माहितीच्या प्रसारासाठी होऊ नये, याची काळजी आपण सर्वांनी घेणे गरजेचे आहे. (Women in Indian Armed Forces)

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here