भारतानं मुसक्या आवळताच पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम (Pahalgam terror attack) येथे मंगळवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. या हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले, ज्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आणखी तीव्र झाला आहे. (India Pakistan tension)

मंगळवारी दुपारी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba attack) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, ओडिशा, नेपाळ आणि यूएई येथील पर्यटकांचा समावेश होता. या घटनेनंतर केंद्र सरकारने तातडीने आपत्कालीन बैठक घेत देशभरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियातील दौरा अर्धवट सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला, तर गृहमंत्री अमित शहा यांनी श्रीनगरला भेट देऊन सुरक्षा यंत्रणांशी चर्चा केली.

या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली आहेत. भारताने १९६० च्या सिंधू जल कराराला स्थगिती दिली आहे, ज्याचा पाकिस्तानच्या शेती आणि दैनंदिन गरजांवर मोठा परिणाम होऊ शकतो. याशिवाय, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारताने अटारी-वाघा सीमा बंद करण्याचा निर्णयही घेतला आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील थेट दळणवळण पूर्णपणे खंडित होणार आहे. (India suspends Indus Water Treaty)

भारत सरकारच्या या निर्णयानंतर आता पाकिस्तानच्या सुरक्षा समितीची बैठक पार पडली आहे, या बैठकीमध्ये मोठे निर्णय घेण्यात आले आहे. पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे भारत-पाकिस्तान दरम्यानच्या विमानसेवांवर परिणाम होणार आहे. तसेच, भारतासोबतचा सर्व व्यापार बंद करण्याचे आणि भारतीय कंपन्यांशी कोणतेही व्यावसायिक व्यवहार थांबवण्याचे आदेश देण्याबरोबरच, पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना परत जाण्यास सांगितले आहे. याशिवाय, पाकिस्तानमधील भारतीय नागरिकांचे व्हिसा रद्द करून त्यांना तातडीने परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अटारी-वाघा सीमा बंद करण्याचा निर्णयही पाकिस्तानने घेतला आहे. (Pakistan closes airspace)

या निर्णयांचा सर्वाधिक फटका दोन्ही देशांतील सामान्य नागरिकांना बसणार आहे. विशेषतः व्यापार आणि दळणवळण बंद झाल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तज्ञांच्या मते, पाकिस्तानला याचा अधिक फटका बसू शकतो, कारण सिंधू जल कराराच्या स्थगितीमुळे पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. (India Pakistan diplomatic relations)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here