लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार? एप्रिलचा हप्ता 'या' तारखेला मिळण्याची शक्यता

महाराष्ट्रातल्या महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Ladki Bahin Scheme) योजनेने आत ९ हप्त्यांचं वाटप आतापर्यंत पूर्ण झालं आहे. आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याची उत्सुकता राज्यभरातल्या महिलांना लागली आहे.

या योजनेच्या लाभार्थींना आतापर्यंत नियमित पैसे मिळाले असले, तरी यंदा एप्रिलचा हप्ता रखडल्याने अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. या सगळ्यात एक मोठी बातमी समोर आली आहे, अक्षय तृतीया म्हणजे ३० एप्रिलपर्यंत महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकतात. (Mazi Ladki Bahin scheme)

‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक आधार देण्याचा सरकारचा मानस आहे. आतापर्यंत या योजनेतून ९ हप्त्यांचं वाटप झालं असून, लाखो महिलांना त्याचा फायदा झाला आहे. दर महिन्याला नियमितपणे पैसे मिळत असल्याने या योजनेने अनेक कुटुंबांना हातभार लावला आहे. पण एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप जमा झाला नसल्याने महिलांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. विशेषत: ग्रामीण भागात आणि छोट्या शहरांमध्ये या हप्त्याची वाट पाहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. (April installment date)

हे वाचलं का? – “मेरी नजरसे तुम देखो तो गद्दार..”, कुणाल कामराने उडवली एकनाथ शिंदेंची खिल्ली; संजय राऊतांकडून Video ट्विट

सुरुवातीला असं बोललं जात होतं की, ६ एप्रिल रोजी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर हा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होईल. रामनवमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि या दिवशी पैसे मिळतील, अशी आशा अनेकांना होती. पण रामनवमी येऊन गेली, तरी खात्यात पैसे जमा झाले नाहीत. यामुळे अनेक महिलांचा हिरमोड झाला. सोशल मीडियावरही या योजनेच्या हप्त्याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले. “हप्ता कधी येणार?” असा सवाल अनेकांनी विचारला, पण प्रशासनाकडून कोणतंही स्पष्ट उत्तर मिळालं नाही. (Akshaya Tritiya payment update)

रामनवमीनंतर हप्त्याबाबत शांतता पसरली असताना, आता एक नवी माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून असं कळतंय की, एप्रिल महिन्याचा हप्ता ३० एप्रिल रोजी अक्षय तृतीया या सणाच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात येऊ शकतो. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मात महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी नवीन सुरुवात आणि आर्थिक लाभ यांचा संबंध जोडला जातो. त्यामुळे या शुभ मुहूर्तावर पैसे जमा करण्याचा विचार सरकार करत असल्याची चर्चा आहे. पण ही माहिती अद्याप अधिकृतरित्या जाहीर झालेली नाही. (Maharashtra women scheme)

हे वाचलं का? – औरंगजेब कबर, सौगात-ए-मोदी ते कुणाल कामरा; पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे शिंदे-भाजपवर तुफान बरसले

या योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया दिसत आहेत. शिर्डीतील एक गृहिणी म्हणाल्या, “आम्हाला दर महिन्याला पैसे मिळाले, पण यावेळी का उशीर होतोय, हे समजत नाही. अक्षय तृतीयेपर्यंत पैसे येतील असं ऐकलंय, पण खात्री नाही.” दुसरीकडे, मुंबईतल्या गृहिणीने सांगितलं, “हप्ता लवकर मिळाला तर आमच्या छोट्या-मोठ्या गरजा भागतात. आता महिना संपत आलाय, तरी पैसे नाहीत. सरकारने लवकर निर्णय घ्यावा.” (CM Mazi Ladki Bahin latest news)

‘माझी लाडकी बहीण’ ही योजना महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दरमहा ठराविक रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाते. विशेषत: ग्रामीण भागातल्या आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना याचा मोठा आधार मिळाला आहे. आतापर्यंत ९ हप्त्यांमुळे अनेकांना घरखर्च, मुलांचं शिक्षण किंवा छोटे व्यवसाय यासाठी मदत झाली आहे. (Government financial aid for women)

एप्रिलचा हप्ता का उशिरा होतोय, याबाबत प्रशासनाकडून कोणतंही ठोस कारण समोर आलेलं नाही. काहींच्या मते, प्रशासकीय प्रक्रियेत झालेला विलंब हे कारण असू शकतं. तर काहींचं असं म्हणणं आहे की, सरकार शुभ मुहूर्ताची वाट पाहत आहे. “अक्षय तृतीया हा सण शुभ मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या दिवशी हप्ता देण्याचा विचार असू शकतो,” असं बोललं जात आहे. पण याबाबत अधिकृत घोषणा न झाल्याने संभ्रम कायम आहे.

हे वाचलं का? – ‘ती’ चूक पुन्हा करू नका, संभाजी भिडेंना तात्काळ जेलमध्ये टाका; प्रकाश आंबेडकरांनी CM फडणवीसांकडे का केली मागणी?

अक्षय तृतीया हा सण संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो. या दिवशी सोनं खरेदी करण्यापासून ते नवीन सुरुवात करण्यापर्यंत अनेक गोष्टी शुभ मानल्या जातात. त्यामुळे सरकारने हा दिवस निवडला असेल, तर त्याला सांस्कृतिक महत्त्व आहे, असं काहींचं मत आहे. पण महिलांना प्रश्न पडलाय – सणापेक्षा आमच्या गरजा महत्त्वाच्या नाहीत का?

एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेपर्यंत जमा झाला, तर महिलांना दिलासा मिळेल. पण भविष्यात असा विलंब टाळण्यासाठी सरकारला ठोस नियोजन करावं लागेल. “हप्ता नियमित मिळाला तरच योजनेचा खरा उद्देश सफल होईल,” असं तज्ज्ञांचं मत आहे. योजनेची लोकप्रियता टिकवायची असेल, तर वेळेवर अंमलबजावणी महत्त्वाची आहे.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here