शिंदेंवरील कवितेनंतर कुणाल कामराविरोधात वैजापुरात शिवसैनिक आक्रमक; गुन्हा दाखल करण्याची मागणी

वैजापूर । दिपक बरकसे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवण्यावरून स्टँण्डअप कॅमेडियन कुणाल कामरा अडचणीत सापडलाय. त्याच्याविरोधात राज्यातील अनेक ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एका विडंबनात्मक काव्याच्या माध्यमातून खिल्ली उडवल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले.

वैजापुरात शिवसेनेच्या कार्यकर्त्याकडून आंदोलन करण्यात आले आहे. तसेच कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब शिवाजीराव जगताप यांनी तहसीलदारांना निवेदन दिलं आहे.

हे वाचलं का? – “मेरी नजरसे तुम देखो तो गद्दार..”, कुणाल कामराने उडवली एकनाथ शिंदेंची खिल्ली; संजय राऊतांकडून Video ट्विट

बाबासाहेब जगताप यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुणाल कामरा यांनी विविध माध्यमांतून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याने जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. महाराष्ट्रातील विविध वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झालेल्या बातम्यांनुसार, या वक्तव्यामुळे जनमानसात आक्रोश निर्माण झाला असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

एकनाथ शिंदे हे राज्यातील महत्त्वाचे राजकीय नेते असून, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचे मोठे जनाधार आहे. त्यांच्याविरोधात कुणाल कामरा यांनी केलेले वक्तव्य हे अपमानास्पद आणि चुकीच्या उद्देशाने करण्यात आले आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे संबंधित वक्तव्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

हे वाचलं का? – राजकारणात मोठी उलथापालथ! ‘मविआ’ साफ, अनेक दिग्गज नेत्यांचा भाजपात प्रवेश

शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या या निवेदनात कुणाल कामरा यांच्या विरोधात तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी आवश्यक पावले उचलावीत, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here