शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

पंजाबमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे मोगा जिल्हाध्यक्ष मंगतराम मंगा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. खलिस्तानी समर्थकांनी हा हल्ला केल्याचा आरोप होत असून, यामुळे संपूर्ण पंजाबमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. (Mangtaram Manga murder)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या हत्येची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. त्यांनी या घटनेचे तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केले आहे. “मंगतराम मंगा यांची क्रूरपणे हत्या झाली, ही अत्यंत दु:खद घटना आहे. खलिस्तानी समर्थकांनी एका शिवसैनिकाला खुलेआम ठार केलं. हे पंजाब सरकारच्या कमकुवत व्यवस्थेचं द्योतक आहे. आम्ही पंजाबमधील ‘आप’ सरकारचा निषेध करतो. आरोपींना तात्काळ पकडून त्यांना कठोर शिक्षा द्यावी,” अशी मागणी शिंदे यांनी केली. (Punjab shooting news)

हे वाचलं का? – रात्रीच्या प्रवासातील ‘डेथ अवर्स’! अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

“या कठीण प्रसंगी शिवसेना मंगतराम यांच्या कुटुंबियांसोबत खंबीरपणे उभी आहे. त्यांच्या कुटुंबाला तातडीने 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी मंगतराम यांना श्रद्धांजली वाहताना म्हटलं, “हिंदुत्वासाठी समर्पित आणि राष्ट्रभक्त असलेले मंगतराम मंगा हे शिवसेनेचे निष्ठावान जिल्हाध्यक्ष होते. त्यांचं नुकसान आमच्यासाठी मोठी हानी आहे.” (breaking news India)

या घटनेनंतर पंजाबमधील वातावरण तापलं असून, आरोपींना लवकरात लवकर पकडावं, अशी मागणी जोर धरत आहे. ही हत्या नेमकी का झाली, याचा तपास पोलीस करत आहेत. पण या घटनेमुळे पंजाबच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. (Khalistani attack)

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here