तब्बल ३५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे झाले हलके

वैजापूर । दिपक बरकसे

वैजापूर तालुक्यातील बोर दहेगाव येथील रामकृष्ण गोदावरी उपसा सहकारी जलसिंचन योजनेअंतर्गत घेतलेले सुमारे ६३ कोटी ६७ लाख रुपयांचे कर्ज अखेर माफ करण्यात आले आहे.

आमदार रमेश पाटील बोरनारे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा शासन निर्णय मागील वर्षी जून महिन्यात जाहीर करण्यात आला होता. शुक्रवारी शासनाने जिल्हा बँकेस हा निधी वितरित केला असून, त्यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया वेगवान झाली आहे.

या निर्णयामुळे चौदा गावांतील २,२१७ शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल ३५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे हलके झाले असून, त्यांनी आमदार बोरनारे यांचे आभार मानले. या ऐतिहासिक निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने आमदार बोरनारे यांचा सत्कार केला.

हे वाचलं का? – “संतोष देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातून दाखवण्याचा प्लॅन, महिलाही तयार होती, पण…”; भावाचा खळबळजनक खुलासा

सत्कार समारंभास जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाढे, उपाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, कृष्णा पाटील डोणगावकर, माजी आमदार नितिन पाटील, आण्णासाहेब माने, संचालक आप्पासाहेब पाटील, माजी सभापती बाबासाहेब जगताप आणि संचालक मंडळ उपस्थित होते.

१९९० मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत या योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेत जलसिंचन योजना पूर्ण करण्यात आली होती. मात्र, ही योजना दीर्घकाळ टिकली नाही आणि त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले. अखेर शासनाच्या निर्णयामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.

हे वाचलं का? – प्रेमात आंधळ्या झालेल्या आईनेच पोटच्या गोळ्याला संपवलं, अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने काढला काटा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here