वैजापुरात प्रधानमंत्री आवास योजनेचा ११ हजार २१२ लाभार्थी लाभ घेणार

वैजापूर । दिपक बरकसे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीनुसार आणि देशातील कोणताही व्यक्ती त्याच्या हक्काच्या घरापासून वंचित राहू नये या उद्देशाने, आज राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत, वैजापूर तालुक्यातील सुमारे ११ हजार २१२ लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली. यासोबतच ८ हजार २३२ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला.

देशातील प्रत्येक गरिबाचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ (२०२४-२५) अंतर्गत, राज्याच्या ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागातर्फे पुण्यात महाराष्ट्रातील २० लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि १० लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरित करण्याचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

हे वाचलं का? – शिंदे-फडणवीसांमध्ये नाराजीचा नवा अंक? शिंदेंच्या आमदारांची Y दर्जाची सुरक्षा काढली, आता केवळ…

वैजापूर पंचायत समिती सभागृहात या योजनेंतर्गत आमदार रमेश बोरनारे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील ११ हजार २१२ लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात आले. तसेच ८ हजार २३२ लाभार्थ्यांना प्रथम हप्ता त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यावर १५,००० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

या कार्यक्रमाला कृ.उ.बा.स. सभापती रामहरी जाधव, सहायक गटविकास अधिकारी अक्षय भगत, संचालक गोरख आहेर, भाजप तालुकाध्यक्ष नारायण पा. कवडे, मोहन साळुंके, आनंद निकम, विस्तार अधिकारी अमय पवार, हरिभाऊ साळुंके, राहुल शेळके तसेच पंचायत समितीचे कर्मचारी, सरपंच व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत गोरगरीब आणि गरजू कुटुंबांना घरे मिळावीत, यासाठी हा महत्त्वाचा टप्पा पार पडला असून लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here