
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ शनिशिंगणापूर हे देवस्थान आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी नाव जोडले गेले. हे एक तीर्थक्षेत्र मानले जात असून तिथे शनीदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत. या ठिकाणी लाखो भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात. (Shani Shingnapur temple rules)
परंतु, या मंदिराच्या समितीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शनिशिंगणापूरच्या शनि देवाला आता फक्त ब्रँडेड तेलानेच अभिषेक करण्यात येणार आहे. हा बदल १ मार्चपासून लागू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. शनिशिंगणापुरात शनिदेवाच्या शिळेची झीज होत आहे. शनि देवाच्या स्वयंभू शिळेची झीज रोखण्यासाठी शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ न्यास आणि ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला. (Shani Dev oil offering)
हे वाचलं का? – प्रेमात आंधळ्या झालेल्या आईनेच पोटच्या गोळ्याला संपवलं, अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने काढला काटा
शनिशिंगणापूर देवस्थानाने आपला निर्णय जाहीर करताना म्हटले की, साधे तेल केमिकल युक्त असल्यामुळे शनि देवाच्या शिळेवर (शनी चौथऱ्यावर मूर्ती नसून दगडाची स्वयंभू शिळा आहे) परिणाम होत आहे. अनेक भाविक वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यतेल, सुटे तेल किंवा मिश्रित तेल आणून अभिषेक करत असतात. यामध्ये अन्न आणि भेसळ तपासणी अहवालांनुसार असे आढळले की, काही तेलांमध्ये भेसळ असल्याने शनिदेवाच्या मूर्तीवर परिणाम होत आहे. (Branded oil for Shani Dev)
त्यामुळे शनिदेवाच्या शिळेची झीज होते आहे. याचपार्श्वभूमीवर शनिदेवाच्या शिळेची झीज होऊ नये म्हणून विश्वस्त मंडळाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शनि शिंगणापूर देवस्थानच्या नवीन नियमांनुसार १ मार्चपासून भाविकांना फक्त ब्रँडेड आणि शुद्ध रिफायनरी तेलानेच शनिदेवावर अभिषेक करावा लागणार आहे. (Shani Shingnapur latest news)
हे वाचलं का? – जिल्हा बँकेच्या महिला कॅशिअरचा विनयभंग, तालुका विकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
शनि देवाला तेल वाहण्याची परंपरा
शनिदेवाला तेल अर्पण केल्याने कुंडलीतील शनि बलवान होतो. त्या व्यक्तीला शनिदेवाची कृपा प्राप्त होते, अशी मान्यता आहे. शनिदेव न्याय देवता म्हणून ओळखले जातात. त्यामुळं तेल अर्पण केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि भक्तांचे दुःख दूर होतात, अशीही मान्यता आहे. (Shani Dev history and traditions)
पौराणिक कथा काय?
त्रेतायुगात बजरंगबली हनुमानाने शनिदेवाच्या शरीरावर तेल लावले होते. त्यामुळं त्यांच्या वेदना दूर झाल्या होत्या. तेव्हा शनिदेवाने म्हटलं होतं की, जो भक्त माझ्यावर विधीपूर्वक मोहरीचे तेल अर्पण करेल. त्याला जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळेल. तेव्हापासून शनिदेवाला तेल अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली. (Shani Dev worship rituals)
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



