
वैजापूर । दिपक बरकसे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी, त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती वैजापूर शहरात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. शहरातील जीवन गंगा सोसायटीच्या सार्वजनिक वाचनालयातील महिलांनी गीत गायनाद्वारे त्यांना अभिवादन केले.
शहरातील मुख्य चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रमाई चौकात त्यांच्या भव्य प्रतिमेस अभिवादन करून खीरदान करण्यात आले. तसेच जीवन गंगा सोसायटीतील वाचनालयाच्या वतीनेही खीरदानाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात डॉ. उद्धव कुडके यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी माता रमाई यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या संघर्षमय जीवनाची माहिती दिली. महिलांनी भीम-रमाई स्तुती गाऊन त्यांना अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथेही माता रमाई यांना अभिवादन व खीरदान करण्यात आले. या वेळी शहरातील अधिकारी, कर्मचारी तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


