तितरखेडा येथे भरदिवसा घरफोडी; दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

वैजापूर । दिपक बरकसे

तालुक्यातील सावखेड खंडाळा येथे काही दिवसांपूर्वीच भरदिवसा चोरीची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना तितरखेडा येथे भरदिवसा घरफोडीची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोंयंडा तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३१,२०० रुपयांचा ऐवज लंपास केला.

ही घटना शुक्रवारी (७ फेब्रुवारी) सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजेच्या दरम्यान तितरखेडा येथील शेत गट क्रमांक १३ मध्ये घडली. घटनेची माहिती मिळताच शिऊर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण परिसराची पाहणी केली. या चोरीत २०,००० रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा ऐवज चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले.

हे वाचलं का? – नाशिक हादरलं! अल्पवयीन गतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार, इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून फेकून देत हत्या

या प्रकरणी तितरखेडा येथील सोमीनाथ दादासाहेब साळुंखे (वय ३४) यांनी शिऊर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. (Titarakheda robbery)

संपूर्ण शिऊर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, भरदिवसा चोरीच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाने सुरक्षा वाढवावी, अशी मागणी केली आहे.

पोलीस याबाबत अधिक तपास करत असून, लवकरात लवकर आरोपींचा शोध घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे. तरी नागरिकांनी सावध राहावे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra crime news)

प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here