वैजापूर शहरातील वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी ५० कोटींचा प्रस्ताव - आमदार प्रा. रमेश बोरनारे

वैजापूर । दिपक बरकसे

शहरातील नागरिकांना दररोज स्वच्छ पाणीपुरवठा मिळावा यासाठी नगरपालिकेने ५० कोटी रुपये खर्चाच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा (Water Supply Project) प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. या प्रस्तावाबाबतची माहिती शिवसेनेचे आमदार प्रा. रमेश बोरनारे (MLA Ramesh Bornare) यांनी एका कार्यक्रमात दिली.

नगरविकास विभागाच्या निधीतून श्रीराम कॉलनी व साईनाथ नागरी वसाहतीसाठी मंजूर झालेल्या पावणे पाच कोटी रुपये निधीतील विकासकामांचे लोकार्पण व शुभारंभ या कार्यक्रमात आ. बोरनारे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर होते. तसेच माजी सभापती बाबासाहेब जगताप, संजय निकम आणि डॉ. राजीव डोंगरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. (Vaijapur Development)

हे वाचलं का? – रात्रीच्या प्रवासातील ‘डेथ अवर्स’! अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

नगरपालिकेने २०१२ मध्ये सुरू केलेली पाणीपुरवठा योजना (Municipal Water Plan) अर्धवटच राहिल्याने शहरातील कुटुंबांना दररोज पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे दिसून आले. या योजनेत पुरेशा जलकुंभांची उभारणी न केल्याने हा अडथळा निर्माण झाल्याचे आ. बोरनारे यांनी स्पष्ट केले. तसेच जलशुद्धीकरण केंद्राची देखभाल न झाल्यामुळे ते बंद अवस्थेत आहे, परिणामी नागरिकांना तीन ते चार दिवसाआड प्रक्रिया केलेले पाणी प्यावे लागत असल्याची गंभीर बाब त्यांनी अधोरेखित केली.

हे वाचलं का? –  नांदूर मधमेश्वर कालव्यातून ‘रब्बी’साठी दुसरे आवर्तन सोडा; आ. बोरनारेंची मागणी

नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचा विस्तार करण्यासाठी ५० कोटींचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे सादर करण्यात आला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहराला निधी मंजूर करण्याचे साकडे घालण्यात आल्याचे बोरनारे यांनी सांगितले. (Government Water Projects)

अध्यक्षीय समारोपात माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी आ. बोरनारे यांनी वैजापूर मतदारसंघासाठी तीन हजार कोटी रुपयांचा विकास निधी मिळवण्याचा विक्रम केला असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Water Purification Plant)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here