
वैजापूर । दिपक बरकसे
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’मुळं (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं आहे. लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत ७ हप्ते महिलांच्या खात्यात वर्ग झाले आहेत. महिलांना १० हजार ५०० रुपये मिळाले आहेत. मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांवर आता बोट ठेवले जात आहे.
शासनाच्या नियमानुसार, कोणत्याही एका वैयक्तिक लाभाच्या योजनेचा (Maharashtra government schemes) लाभार्थी एकाचवेळी लाभ घेऊ शकतो. मात्र, अनेक लाभार्थी एकाच वेळी लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांचा लाभ घेत असल्याने, सरकारने यासंदर्भात नवीन नियम लागू केले आहेत. (women empowerment scheme)
हे वाचलं का? – रात्रीच्या प्रवासातील ‘डेथ अवर्स’! अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर
६५ वर्षांपर्यंतच्या महिलांसाठी असलेल्या संजय गांधी निराधार योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojana) व श्रावणबाळ योजनेच्या (Shravanbal Yojana) लाभार्थींनी आता कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, याबाबत स्पष्टता देण्यासाठी स्वयंघोषणापत्र (new self-declaration rule) सादर करणे बंधनकारक असेल. या स्वयंघोषणापत्राद्वारे लाभार्थींनी जाहीर करावे लागेल की, ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नाहीत आणि त्यांनी कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा आहे.
वैजापूर तालुक्यातील २०,४५६ लाभार्थ्यांसाठी दरमहा जवळपास ३० कोटी ६ लाख ८४ हजार रुपयांचा निधी आवश्यक असतो. श्रावणबाळ योजनेतील लाभार्थींना दरवर्षी हयात असल्याचा दाखला द्यावा लागतो, तसेच आता नवीन नियमांनुसार स्वयंघोषणापत्रही आवश्यक ठरणार आहे. (Majhi Ladki Bahin Yojana new rules)
सध्या संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा १,५०० रुपये अनुदान दिले जाते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत देखील समान रक्कम देण्यात येते. मात्र, भविष्यात लाडकी बहीण योजनेच्या अनुदानाची रक्कम २,१०० रुपये होण्याची शक्यता असल्याने, अनेक लाभार्थी सध्याच्या योजनांचा (Maharashtra welfare schemes) त्याग करून या नव्या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे, दोन्ही योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना आता एका योजनेचा त्याग करावा लागणार आहे. (government subsidy for women)
हे वाचलं का? – धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अत्याचारासाठी १०० रुपयांची सुपारी, हत्येचा ही होता प्लॅन पण…; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
लाभार्थींची सद्यस्थिती
- संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी: ५,३१२
- श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी: १५,१४४
- एकूण लाभार्थी: २०,४५६
- दरमहा अनुदानासाठी आवश्यक रक्कम: ३०,६८४,००० रुपये
योजनेचा लाभ नियमित सुरू ठेवायचा की लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे, यावर स्वयंघोषणापत्र द्यावे लागणार आहे. संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थीसाठी अनुदानाची मागणी केली आहे.
– किरण नारखेडे, नायब तहसीलदार वैजापूर
प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


