
वैजापूर । दिपक बरकसे
समृद्धी महामार्गावर बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. अज्ञात वाहनाला पाठीमागून रुग्णवाहिका (Ambulance Crash News) धडकून दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात हडस पिंपळगाव शिवारात घडला. (Samruddhi Expressway Accident)
मृतांमध्ये समीर मोहम्मद (५७) आणि अमीना खातून (५२), दोघेही राहणार बिहार यांचा समावेश आहे. तर प्रकाश विक्रम पाटील (४५, नाशिक), मोहम्मद इम्तियाज (४०, बिहार), गुलाब शाह खातून (२०, बिहार), सचिव रामदास करे (४२, नाशिक) आणि हासिफ समीर मोहम्मद (३४, बिहार) हे अपघातात जखमी झाले आहेत. (Maharashtra Road Accident)
हे वाचलं का? – रात्रीच्या प्रवासातील ‘डेथ अवर्स’! अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समीर मोहम्मद यांना वैद्यकीय उपचारांसाठी नाशिक येथील रुग्णालयातून बिहारमधील पटणा एम्स (Patna AIIMS) रुग्णालयात हलवले जात होते. त्यांच्या नातेवाईकांसह रुग्णवाहिका क्रमांक MH 15 EF 0089 समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असताना हडस पिंपळगाव येथे अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक बसली.
अपघातानंतर महामार्ग पोलिस विभागाचे हेड कॉन्स्टेबल सचिन पाटील, शेख, महामार्ग सुरक्षा बलचे शिवाजी बेळे, किरण लोहार, दिनेश कोल्हे, वैजापूर पोलीस ठाण्याचे किरण गोरे, भोजने, जटाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना तातडीने वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवले.
हे वाचलं का? – राहुल सोलापूरकर नरमला, टाळकं आलं ठिकाण्यावर; शिवरायांबद्दल बोलून झाल्यावर व्यक्त केली दिलगिरी!
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी समीर मोहम्मद आणि अमीना खातून यांना मृत घोषित केले. तर उर्वरित जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हासिफ समीर मोहम्मद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रुग्णवाहिका चालक किरण हरिश्चंद्र साळुंके (रा. अंबड, नाशिक) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास वैजापूर पोलीस करीत आहेत. (Breaking News)
प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


