वाल्मिक कराड अन् महिला पोलीस अधिकाऱ्याच्या व्हायरल Audio Clip ने खळबळ, काय झालं संभाषण?

बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने (antosh Deshmukh murder case) महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. वाल्मिक कराड (Walmik Karad) सध्या तुरुंगात असला तरी दिवसेंदिवस वाल्मिक कराडचे एक एक कारनामे समोर येत आहेत.

अशातच आता वाल्मीक कराडची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये कराड आणि एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा संवाद ऐकायला मिळतो. या क्लिपमुळे एकच खळबळ उडाली आहे. (viral audio clip)

लोकसभा निवडणुकीदरम्यान सोशल मीडियावरील कराडच्या कार्य़कर्त्यानं टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्टविरोधात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी वाल्मिक कराडनं तत्कालीन सायबर सेलच्या (cyber cell officer) महिला पोलीस अधिकारी निशिगंधा खुले यांना फोन केला होता. या संभाषणात वाल्मिकनं थेट मी बीडचा बाप असल्याचं सांगत कायदा सुव्यवस्थेची लक्तरच वेशीला टांगल्याचं दाखवलंय.

हे वाचलं का? – अस्मानीसह सुलतानी संकट! तणनाशक फवारणीमुळं १०० एकरावरचा कांदा नष्ट, नाशिक जिल्ह्यातील प्रकार

ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय संभाषण आहे?

कार्यकर्ता – अण्णा नाशिकमधून बोलतोय. मला पोलीस स्टेशनमधून पुन्हा फोन येऊ लागले आहेत
वाल्मिक कराड – कोणाचा फोन आला होता, त्यांचा नंबर टाकता का
कार्यकर्ता – पीएसआय कुलथे
वाल्मिक कराड – मला नंबर द्या
वाल्मिक कराड – ताई वाल्मिक कराड बोलतोय, ती चिल्लर पोरं आहे, ती काय करणार आहे
निशिगंधा खुळे, सायबर पोलीस – पोस्ट डिलीट केली तर झालं अण्णा, आणखी काय हवं
वाल्मिक कराड – पोस्ट डिलीट करुन टाका.
कार्यकर्ता – हो करतो अण्णा.
निशिगंधा खुळे – वातावरण खराब होतं, सगळ्यांचेच फोन सुरु होते.
वाल्मिक कराड – आम्ही शांत होतो, त्यांनीच सुरुवात केली. अरेला कारे होतं.
वाल्मिक कराड कार्यकर्त्यांना उद्देशून – एवढं काय मनावर घ्यायचं नाही. इथं बाप बसलो आहे आपण.
कार्यकर्ता – तुम्ही आहात म्हणूनच दम धरला आहे.

(Headlines Marathi  या ऑडिओ क्लीपची पुष्टी करत नाही)

हे वाचलं का? – १ रुपयांत पीक विमा योजनेत गैरप्रकार, योजना खरंच बंद होणार?; काय म्हणाले राज्याचे कृषीमंत्री?

या ऑडिओ क्लिपची अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. मात्र, या क्लिपमुळे वाल्मिक कराड पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. पोलिसांना फोन करून हवे तसे करायला लावणे किंवा “आपण बाप आहोत” असे म्हणत दहशत निर्माण करण्याचे काम जिल्ह्यात केले जात असल्याचा आरोप या निमित्ताने पुन्हा एकदा होत आहे. सध्या वाल्मिक कराड मकोका गुन्ह्यांतर्गत एसआयटीच्या (SIT investigation) कोठडीत आहे. गेल्याच आठवड्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांच्या उपचारानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन पुन्हा कारागृहात (Jail) पाठवण्यात आले आहे. (viral news Maharashtra)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराड आणि पोलिसांमधील एक कथित संवाद व्हायरल झाला होता. आरोपीला मदत करण्यावरून हा संवाद झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी ऑडिओ क्लिप संदर्भातील आरोप फेटाळले आहेत. वाल्मिक कराड आणि पोलिसांमधील कथित संवाद व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आपली प्रतिक्रया दिली आहे. व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही, याप्रकारे मी गुन्हा दाखल करणार आहे, असे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी म्हटलंय.

प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here