
वैजापूर । Vajapur
तालुक्यातील खंडाळा शिवारात गुरुवारी दुपारी अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, खंडाळा-वैजापूर महामार्गावरील पालेजा पेट्रोल पंपाजवळ मृतदेह आढळून आला होता. पोलीस पाटील नितीन बागुल यांनी याबाबत पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.
हे वाचलं का? – चिमुकल्या पुतणीसाठी ९ महिन्यांची गर्भवती बिबट्याला भिडली! वैजापूरच्या आधुनिक हिरकणी पल्लवीताईंची गोष्ट
मृतदेहाच्या अंगावर फक्त नाईट पॅन्ट असून शर्ट नसल्याने मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. ओळख पटवण्यासाठी मृत व्यक्तीचे फोटो प्रसारित करण्यात आले आहेत.
घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख, उपनिरीक्षक नितीन नलवाडे, गोपनीय शाखेचे ज्ञानेश्वर मेटे, बीट जमादार विशाल पडळकर, अविनाश भास्कर, महेश बिरुटे, तसेच पोलीस पाटील नितीन बागुल उपस्थित होते. या प्रकरणाचा पुढील तपास वैजापूर पोलीस करत आहेत.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


