दिनेश वाघमारे राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त

ज्‍येष्ठ सनदी अधिकारी दिनेश वाघमारे (Dinesh Waghmare) यांची राज्याच्‍या निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत सोमवारी (ता.२०) राज्यपालांनी (Governor) शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी त्यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केली होती. राज्यापालांकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर राज्य सरकारनं वाघमारेंच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. दिनेश वाघमारे हे अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे अधिकारी आहेत. ते सध्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव होते.

हे वाचलं का? – नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन कोण करणार?

राज्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान हे सप्टेंबरमध्ये निवृत्त झालेले आहे. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. नव्या आयुक्तांची निवड गेल्या काही महिन्यांपासून रखडली होती. आयुक्तपदासाठी माजी मुख्य सचिव नितीन करीर, मुंबई पोर्ट ट्रस्टचे (बीपीटी) माजी अध्यक्ष राजीव जलोटा, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांच्यासह डझनभर सनदी अधिकारी इच्छुक होते.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी नवनिर्वाचित निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यावर असणार आहे. आगामी काळात होत असलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यापासून ते मतदारयाद्यांची निर्मिती यांसारखे अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर असणार आहे.

हे वाचलं का? – चिमुकल्या पुतणीसाठी ९ महिन्यांची गर्भवती बिबट्याला भिडली! वैजापूरच्या आधुनिक हिरकणी पल्लवीताईंची गोष्ट

दिनेश वाघमारे हे १९९४ च्या बॅचचे वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिलेले आहे. ते सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव आहेत. वाघमारे यांना व्यवस्थापन व प्रशासन क्षेत्रातील २६ वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. त्यांनी बी. ई. (इलेक्ट्रॉनिक्स) विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतून (व्हीएनआयटी) केले आहे. ते आयआयटी खरगपूरचे एम.टेक. (कॉम्प्युटर सायन्स) इंजिनिअर आहेत. इंग्लंडच्या ब्रॅडफोर्ड विद्यापीठातून त्यांनी विकास आणि प्रकल्प नियोजन या विषयातून एमएसस्सी केलेली आहे.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here