डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची परीक्षा ३१ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या परीक्षांसाठी चार जिल्हयात मिळून केवळ ७४ केंद्रावर परीक्षा घेण्यात मान्यता देण्यात आली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३० परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली.

जालना १९, बीड १४ तर धाराशीव जिल्ह्यात ११ परीक्षा केंद्राचा समावेश आहे. एमएस्सी. (सर्व विषय), एमकॉम., एमलिब., एमए (एमसीजे), बीजे, एमसीए., एमबीए, एम. एम. एस. आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या सर्व परीक्षा सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत होणार असून, परीक्षेची तयारी झाल्याचे समन्व्यक विभागचे सहायक कुलसचिव भगवान फड यांनी कळविले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची मंगळवारी सुरु झालेली पदवी परीक्षा पहिल्याचा दिवशी गोंधळाची ठरली. बीए, बीकॉम परीक्षेचे हॉलतिकीट परीक्षा सुरू होईपर्यंत न मिळाल्याने ओळखपत्र, बैठक क्रमांकावर तर काही ठिकाणी कायम नोंदणी क्रमांकवर (पीआरएन) परीक्षा देण्याची वेळ अनेक विद्यार्थ्यांवर आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here