
वैजापूर । दीपक बरकसे
आज वैजापूर तालुक्यातील श्रावण बाळ योजना व संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत सुमारे ३,००० प्रस्ताव मागील काही महिन्यांपासून प्रलंबित आहेत. या प्रस्तावास मंजुरी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा वैजापूर तालुका गटनेते विशाल शेळके यांनी अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकूने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रसंगी अडकुने यांनी दूरध्वनी द्वारे प्रलंबित प्रकरणे निकाली काढा अशी सूचना तहसीलदार सुनिल सावंत यांना केली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रावण बाळ योजना व संजय गांधी निराधार अनुदान योजनांचा उद्देश गरजू, वयोवृद्ध, अपंग, निराधार, परितक्ता व विधवा लाभार्थ्यांना नियमित आर्थिक सहाय्य पुरविणे हा असून, अनेक लाभार्थ्यांना हे सहाय्य मिळत नसल्याने ते अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. सदरी प्रस्ताव मंजूर व्हावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांनी आपणास योग्य प्रस्ताव मंजूर करण्याबाबत निर्देश देण्याचे आश्वासन दिले होते.
वैजापूर तालुक्यातील लाभार्थ्यांमध्ये अनेक जण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपले जीवन जगत असून, त्यांना शासनाच्या या योजनांअंतर्गत नियमित आर्थिक सहाय्य मिळणे अत्यावश्यक आहे. सदरील प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जे प्रस्ताव नियमात बसत आहे असे प्रस्ताव मंजूर करण्यात यावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिष्टमंडळ जऱ्हाड उपविभागीय अधिकारी, वैजापूर यांना भेटून दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी भेटून निवेदन ही दिले होते परंतु अजुन पर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. यासाठी लाभार्थ्यांना न्याय मिळाला म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी च्या माध्यमातून लाभार्थ्यांना न्याय मिळाला म्हणून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे असे शेळके यांनी म्हटले आहे.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैजापूर विधानसभा अध्यक्ष तथा माजी सभापती एल. एम. पवार, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बागुल, जिल्हा उपाध्यक्ष जगदीश पवार आदी उपस्थित होते.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.


